रात्रीचा १ वाजला आहे . डोळे झोपाळले आहेत , पण मन झोपू देत नाही . एक साधा सोपा सिनेमा एवढं करू शकतो? अर्ध्या तासा पूर्वी 'कील्ला' हा सिनेमा पहिला. एखादी गोष्ट , नव्हे भावना किंवा संवेदना म्हणू कमीत कमी शब्दात कशी सांगावी याचा उत्तम उदाहरण म्हणजे किल्ला हा सिनेमा. पावसाळी ओला चिंब आणि हिरवा कोकण, १९९० च्या आसपासच साधं सोपं राहणीमान, मोबाईल / इंटरनेट च्या विळख्यात न सापडलेलं 'बाल'पण हे सगळंच खूप नॉस्टॅल्जिक वाटत. गोष्ट सांगता नाही येत, पण भावते नक्की. दिग्दर्शक स्वतःच DoP असल्यामुळे प्रत्येक फ्रेम ने डोळे दिपून जातात. मराठीतला संतोष सिवन आहे हा अविनाश अरुण. बदल , त्याच्याशी जुळवून घेण्याची माणसाची धडपड, आई मुलाचे नाते हे सगळं एका पौगंडावस्थेतील मुलाच्या दृष्टिकोनातून दाखवलं गेलंय . मला या फिल्मने जाग ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे, माझ्या आणि माझ्या कुटुंबाचा आयुष्यात मागच्या एका वर्षात झालेले बदल मला एक वेगळा connect देऊन गेले. जुलै २०१७ मध्ये आम्ही हैदराबाद हुन नोएडा ला आलो. मी नोकरी बदलली आणि त्यामुळे घरही बदलावे लागले. ८ वर्षं हैद्राबादला राहिल्यावर, तिथून उत्तर भारता...
From what happens in my life to what happens in yours. Environment, politics, society, education, economics....in short..."Whatever..."